Aslam Shanedivan
राज्यात नुकसाच झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगाम 2025 मधील पिकांची नोंद ई- पीक पाहणी अॅपद्वारे झालेली नाही
तर ॲपद्वारे आतापर्यंत 1.08 कोटींहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची नोंदणी झाली आहे.
पण आता सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी प्रकिया राबवली जाणार आहे. ती 100 टक्के पूर्ण करण्याचे निर्देश महसूल विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
यासाठी 1 ऑक्टोबरपासून सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी सुरु झाली असून ती 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
ज्यांची ई- पीक पाहणी अॅपद्वारे केली नसेल त्यांची सहाय्यकामार्फत पीक पाहणी होणार असून त्यासाठी गावातील संबंधित सहाय्यकाशी संपर्क करावा लागेल
खरीब हंगामातील पिकांची नोंद करण्याची मागणी केली असता सहाय्यक प्रत्यक्ष शेतावर येऊन उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करतील.
त्यानंतर सहाय्यकाने केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी करतील. जी नंतर 7/12 वर प्रसिद्ध होईल.