Aslam Shanedivan
राज्य शासनाने आईच्या नावाला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयाप्रमाणे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या अधिकृत कागदपत्रांवर प्रथम आईचे, त्यानंतर वडिलांचे आणि शेवटी आडनाव असणार आहे.
राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित तसेच खासगी शाळांसाठी हा नियम बंधनकारक असणार आहे.
या निर्णयानुसार शाळेचे हजेरीपत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) तसेच प्रवेश-निर्गम उतारा यांसारख्या सर्व अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव असेल.
समाजात महिलांचे स्थान बळकट करणे, आईच्या योगदानाला योग्य मान्यता देणे व विद्यार्थ्यांच्या ओळखीत समानता आणणे, हा या निर्णयाचा उद्देशाने आहे.
विभक्त-घटस्फोटीत पालक, दत्तक मुलांच्या हिताचा विचार करून पालकांच्या कागदपत्रांनुसार लवचिकता ठेवली जाणार आहे.
हजेरी किंवा ओळख सांगताना नावाचा उल्लेख हा नवीन नियमानुसार करावा लागणार आहे
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच हा नियम प्रभावी होणार असून, नव्याने प्रवेश घेणाऱ्या तसेच विद्यमान विद्यार्थ्यांच्या नोंदींमध्येही आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.