Rajanand More
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरुध्द भाजप अशी थेट लढत होत आहे.
प्रचारासाठी भाजपकडून देशभरातील नेत्यांची फौज उभी होती. या फौजेसमोर तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तोडीचा प्रचार पक्षाच्या खासदार सायोनी घोष करत होत्या.
सायोनी घोष या अभिनेत्री आणि गायिकाही आहेत. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी आपल्या कलेचा अतिशय चांगल्याप्रकारे वापर करत गाण्यांमधून मतदारांची मने जिंकली.
सायोनी यांच्या पेहरावाचीही बरीच चर्चा झाली. अगदी ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे साधी साडी आणि हवाई चप्पल घालून त्या मतदारांमध्ये सहभागी होत होत्या.
सायोनी यांची आता ममतादीदींशी तुलना होऊ लागली आहे. तृणमूलमध्ये अनेक महिला नेत्या असूनही सायोनी अल्पावधीतच राजकारणात मोठी झेप घेतली आहे.
प्रचारादरम्यान ममतादीदींनंतर सर्वाधिक मागणी सायोनी यांच्या प्रचारसभांना होती, अशी चर्चा आहे. त्यांच्या सभांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत होता.
३२ वर्षांच्या सायोनी यांनी २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्षपद देण्यात आले.
सायोनी यांचा २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. आता त्या स्टार प्रचारक ठरल्या आहेत.