Rajanand More
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2023-24 स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे.
रोहिणी ग्रामपंचायतीस ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 10 लाखांचा रोख पुरस्कार मिळणार आहे. विशाखापट्टणम येथे 9 जूनला या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
ग्रामपंचायतीला राज्य शासनाकडून महाऑनलाईन आयडी प्राप्त झाला आहे़, त्याद्वारे साधारण 956 अन्य सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविल्या जात आहेत़.
ऑनलाईन सेवा ग्रामस्थांना घरबसल्या कशाप्रकारे देता येतील याचा विचार रोहिणी ग्रामपंचायतीने केला आहे़. त्यासाठी विविध माध्यम, शासनाचे अॅप, पोर्टल यांचा वापर केला आहे़.
महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन या विभागातंर्गत ऑनलाईन प्रणालीचा उपयोग सेवा वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे़.
जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. ही सुविधा विशेषत: दुर्गम, आदिवासी भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे प्रमाणपत्र मिळते़.
या ग्रामपंचायतीने निर्णय, मेरी ग्रामपंचायत, चॅट जीपीटी याआधारे ग्रामस्थांचा सहभाग घेतला आहे़. तसेच ग्रामपंचायतीने विविध प्रकारच्या लिंक, युटयुब, फेसबुक, इन्स्टाग्रॉम या माध्यमातून देखील शेअर केले आहेत़.
रोहिणी हे गाव 100 टक्के आदिवासी गाव आहे. असे असूनही शाळा, आरोग्य, अंगणवाडी, कृषी आदींमध्ये ई-गर्व्हनन्स प्रणालीचा वापर केला जात आहे़.