Pradeep Pendhare
एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत आगार, विभाग आणि प्रादेशिक स्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन होणार
आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली आहे.
एसटीच्या दैनंदिन कामकाजाचे मूल्यमापन व नियोजन व्हावे, यासाठी दररोज सकाळी 10 वाजता आगारात, 11 वाजता विभागात आणि दुपारी 12 वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक होणार
प्रवाशांच्या तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा होणार
ऑनलाइन आरक्षणास अधिकाधिक बस उपलब्ध करणे आणि भारमान 80 टक्क्यांपेक्षा कमी न ठेवण्यावर भर असणार
गर्दीच्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता अन् प्रत्येक फेरीवर देखरेख ठेवणे
बसस्थानकांची स्वच्छता अन् प्रसाधनगृहांची दिवसातून तीन वेळा पाहणी व स्वच्छता ठेवणे
उशिरा वा रद्द होणाऱ्या फेऱ्यांची प्रवाशांना माहिती देणे आणि बसस्थानकात संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित करण्याच्या करणे