MSRTC latest update : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता 'या' कागदपत्राशिवाय सवलतीत प्रवास विसरा; शासनाचा मोठा निर्णय!

Rashmi Mane

एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल

एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल सवलतीत प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी राज्य सरकारने नवा नियम लागू केला आहे. आता सवलत मिळवण्यासाठी केवळ ओळखपत्र पुरेसे ठरणार नाही. तर...

NCMC Card msrtc

स्मार्ट कार्ड बंधनकारक

एसटीच प्रसाव करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी किंवा इतर शासकीय योजनांतर्गत सवलतीत प्रवास करणाऱ्यांना आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) घेणे आवश्यक आहे.

NCMC Card msrtc

ओळखपत्र चालणार नाही

पूर्वी फक्त आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवून एसटीचे तिकीट मिळत होते. मात्र आता NCMC कार्ड नसल्यास सवलत नाकारली जाऊ शकते आणि पूर्ण भाडे भरावे लागू शकते.

NCMC Card msrtc

सरकारचा डिजिटल निर्णय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या योजनेची घोषणा केली आहे. हा बदल केवळ नियम नसून डिजिटल आणि पारदर्शक व्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

NCMC Card msrtc

काय फायदे मिळणार?

या कार्डमुळे एसटी प्रवासासाठी सवलतींची नोंद होईल, त्यामुळे सवलतींमध्ये पारदर्शकता येणे सोपे होईल. आणि शासनाच्या सर्व सवलती एका कार्डमध्ये उपलब्ध होतील.

NCMC Card msrtc

कार्डसाठी करार पूर्ण

महामंडळाने या प्रकल्पासाठी Ebix Technologies Ltd आणि NSDL Payments Bank यांच्यासोबत करार केला आहे. लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.

NCMC Card msrtc

कार्डची किंमत किती?

नवीन NCMC कार्डसाठी 199 रुपये (GST सहित) शुल्क आकारले जाईल. जुने स्मार्ट कार्ड परत दिल्यास हे कार्ड 149 रुपयांत उपलब्ध होईल.

NCMC Card msrtc

रिचार्ज कसा कराल?

कार्डमध्ये किमान 100 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. 50 च्या पटीत रक्कम रिचार्ज करता येईल. ETIM मशीन, अधिकृत वेबसाइट, मोबाईल ॲप किंवा अधिकृत एजंटमार्फत रिचार्ज करता येणार आहे.

NCMC Card msrtc | Sarkarnama

Next : चेक बाऊन्स झाल्यास काय शिक्षा होते, कायदा काय सांगतो ?

येथे क्लिक करा