सरकारनामा ब्यूरो
एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून अपेक्षित निधी न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्चचा अर्धाच पगार मिळाला.
या मुद्यावरून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषदेत काही प्रश्नही उपस्थित केले.
एसटी महामंडळ राज्य सरकारकडे अतिरिक्त पैसे मागत नाही, तर हक्काचेच पैसे मागत आहोत, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे ९२८ कोटी रुपयांची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात २२८ कोटी रुपयेच मिळाले, असे सरनाईक म्हणाले.
कर्मचारी नाराज
मार्चमध्ये केवळ ५६ टक्केच पगार मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. या मुद्यावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
अनियमित वेतन व वेतनातील कपातीचा मनस्ताप देण्यापेक्षा हिशेब करून टाकावा, राहिलेल्या सेवेच्या मोबदल्यात आर्थिक लाभ देऊन एकदाचे मोकळे करून टाकावे, अशी प्रतिक्रिया कर्मचारी वर्गामध्ये उमटत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत होणार असल्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे सक्रिय
सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी तातडीने चर्चा केली.