Pradeep Pendhare
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज सायंकाळी आलोक अराधे यांना राजभवन इथं मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ देतील.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायवृंदाने सात जानेवारीला आलोक अराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी शिफारस केली.
केंद्र सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
न्यायमूर्ती आलोक अराधे हे मुळचे मध्यप्रदेशमधील असून, त्यांचा जन्म रायपूर इथं 13 एप्रिल 1964 मध्ये झालेला आहे.
मध्यप्रदेश उच्च न्यायालयात 2009 मध्ये अतिरीक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 2011 मध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये 2016 मध्ये उच्च न्यायालयात बदली झाली. तिथं त्यांनी 2018मध्ये तीन महिने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.
यानंतर त्यांची कर्नाटक राज्यात 17 नोव्हेंबर 2018 मध्ये बदली झाली. तिथं न्यायव्यवस्थेत विविध उपक्रम राबवले.
कर्नाटकमध्ये आॅगस्ट 2022मध्ये अजानसाठी लाऊडस्पीकर वापरण्यावर मनाई करणारी विनंती याचिका फेटाळण्याचा निर्णय गाजला.
अलोक अराधे यांची तेलंगणा राज्यात 19 जुलै 2023 मध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली झाली. त्यानंतर आता त्यांचा न्यायदानाचा प्रवास महाराष्ट्रात सुरू होत आहे.