संस्थाचालकांचे अधिकार घटले! शिक्षक भरतीचा नवा नियम काय?

Jagdish Patil

शिक्षक भरती

खासगी शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे.

Maharashtra Teacher Recruitment | Sarkarnama

गुण

आता संस्थाचालकांना उमेदवारांच्या मुलाखतीसाठी 100 पैकी केवळ 10 गुण देता येणार आहेत.

Maharashtra Teacher Recruitment | sarkarnama

TET

शिक्षक भरतीत 100 पैकी 90 गुण शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि TET च्या आधारे स्वयंचलित पद्धतीने निश्चित केले जातील.

Maharashtra Teacher Recruitment | Sarkarnama

महत्त्व

संस्थाचालकांच्या मुलाखतीतील गुणांचे महत्त्व मर्यादित केल्यामुळे भरती प्रक्रियेत गुणवत्तेला अधिक महत्त्व मिळणार आहे.

Maharashtra Teacher Recruitment

पवित्र पोर्टल

‘पवित्र पोर्टल’अंतर्गत खासगी शाळांमधील 10,328 रिक्त पदांसाठी 11,493 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली.

Teacher Recruitment 2025 | Maharashtra Teacher Recruitment

प्रक्रिया

या उमेदवारांची निवड प्रक्रिया 3 ते 25 नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे.

Maharashtra Teacher Recruitment

यादी

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ 2025 अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची गुणवत्ता यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली.

Maharashtra Teacher Recruitment

प्राधान्यक्रम

मुलाखतीसाठी शिफारस झालेल्या 11,493 उमेदवारांनी एकूण 27,154 प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत.

Maharashtra Teacher Recruitment

सद्यस्थिती

उमेदवारांना पवित्र पोर्टलवर निवडीची सद्यस्थिती पाहता येईल. तसेच व्यवस्थापननिहाय गुणवत्ता यादीही उपलब्ध आहे.

ZP School Teachers Transfer | Sarkarnama

तक्रारी

उमेदवारांना निवड प्रक्रियेबाबत तक्रार असल्यास 7 नोव्हेंबरपर्यंत edupavitra2025grcc\@gmail.com या ईमेलवर पाठवता येईल.

Maharashtra Teacher Recruitment | Sarkarnama

NEXT : उमर अब्दुल्ला 56 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात; कोण आहे दुसरी पत्नी; समोर आले खास फोटो!

क्लिक करा