उमर अब्दुल्ला 56 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात; कोण आहे दुसरी पत्नी; समोर आले खास फोटो!

Rashmi Mane

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला पुन्हा विवाहबंधनात!

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केला फोटो

उमर अब्दुल्ला यांनी निधी राजदान यांच्यासोबतचा फोटो शेअर करत नव्या आयुष्याची सुरुवात झाल्याचे सांगितले. निधी यांनीही 'Its Done Bro' अशी मजेशीर पोस्ट करत विवाहाच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे.

30 ऑक्टोबरला विवाहसोहळा

30 ऑक्टोबर रोजी हा विवाहसोहळा पार पडला. दोघांनीही हा खासगी सोहळा ठेवला होता. यावेळी दोन्ही कुटुंबांतील जवळचे सदस्य उपस्थित होते.

कोण आहेत निधी राजदान?

निधी राजदान या देशातील प्रसिद्ध पत्रकार आणि वृत्तनिवेदिका आहेत. त्यांनी NDTV या वृत्तवाहिनीत अनेक वर्षे काम केले आहे. 'Left, Right & Centre' या कार्यक्रमामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.

घटस्फोट

उमर अब्दुल्ला यांचा यापूर्वी पायल अब्दुल्ला यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, 31 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला.

दोन मुलांचे वडील

उमर अब्दुल्ला यांना दोन मुले आहेत. दोघेही 2011 पासून वेगळे राहत होते. न्यायालयाने दोघांमधील समझोत्याला मान्यता देत घटस्फोटाचा निर्णय दिला.

रिसेप्शनचीही चर्चा

विवाहानंतर दिल्लीमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर जम्मू आणि श्रीनगरमध्येही स्वागत समारंभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या आयुष्याची सुरुवात

वयाच्या 56व्या वर्षी उमर अब्दुल्ला यांनी आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. त्यांच्या विवाहाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या नव्या प्रवासाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Next : आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलायचा आहे? जाणून घ्या योग्य प्रक्रिया 5 स्टेप्समध्ये

येथे क्लिक करा