Ganesh Sonawane
पवित्र पोर्टलद्वारे भरती झालेल्या शिक्षकांसाठी शालार्थ आयडीची प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यामुळे नव्या शिक्षकांचे वेतन सुरू होण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.
यापूर्वी शालार्थ आयडीसाठी मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक कार्यालयात ऑफलाइन प्रस्ताव पाठवावे लागत होते. आता ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल आणि शालार्थ प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची माहिती ऑनलाइन नोंदवून आयडी तयार करता येणार आहे.
शिक्षक प्रत्यक्ष शाळेत रुजू झाल्यानंतर संबंधित शाळा किंवा संस्था त्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर भरणार आहे. आवश्यक तपशील सबमिट केल्यानंतर आयडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
शिक्षकांची आवश्यक माहिती ऑनलाइन भरल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत शालार्थ आयडी तयार होणार आहे. त्यामुळे आयडीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
पूर्वी शालार्थ आयडीसाठी कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया विविध कार्यालयांमार्फत पूर्ण होत होती. आता ऑनलाइन प्रणालीमुळे ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.
शालार्थ आयडी तयार झाल्यानंतर संबंधित शिक्षकाची नोंद शाळेच्या वेतन प्रणालीत उपलब्ध होईल. त्यामुळे वेतन देयक तयार करताना नव्या शिक्षकाचा समावेश करता येईल.
नियुक्तीनंतर वेतन सुरू होण्यासाठी लागणारा प्रशासकीय विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे. नव्या डिजिटल प्रक्रियेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.