Jagdish Patil
'शिक्षक समन्वय संघा'च्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातील शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनात राज्यभरातील जवळपास 20 हजारांहून अधिक शिक्षक सामील झाले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादींचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला असून ते देखील शिक्षकांसोबत आंदोलनस्थळी ठिय्या मांडून आहेत.
पण राज्यभरातील शिक्षकांनी सरकारविरोधात हे आंदोलन का सुरु केलं आहे ते जाणून घेऊया.
राज्य शासनाने ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता.
मात्र, अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंशतः विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक संतप्त झालेत.
शासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं आहे.
8 व 9 जुलै करण्यात येणाऱ्या या आंदोलनामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाणार आहे.