Aslam Shanedivan
राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेता येणार आहे
आदिवासी विकास विभागाने याबाबत प्रक्रिया सुरू केली असून पीएच.डी., पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ४० गुणवंत विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास आणि भोजन), शैक्षणिक, आकस्मिक, इतर खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क आणि आरोग्य विमा दिला जातो
ही शिष्यवृत्ती अमेरिका व इतर देशांसाठी (ब्रिटन वगळून) १ हजार ५०० अमेरिकी डॉलर्स, तर ब्रिटनसाठी १ हजार १०० पौंड अशी आहे
पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे, तर पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये, तसेच विद्यापीठांची क्यूएस जागतिक क्रमवारी पहिल्या २००च्या आतील असणे बंधनकारक असून ती ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक ‘टीओईएफएल’ किंवा ‘आयईएलटीएस’ किंवा समकक्ष परीक्षा विद्यार्थ्याने उत्तीर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे.
MSRTC latest update : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता 'या' कागदपत्राशिवाय सवलतीत प्रवास विसरा; शासनाचा मोठा निर्णय!