Ganesh Sonawane
राज्यात कौशल्य विकास विभागाकडून तरुणांना रोजगार आणि कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जातात. त्यासाठी बेरोजगारांची नावनोंदणी करून घेतली जाते.
फेब्रुवारी २०२५ मध्ये राज्यातील २९ लाख २९ हजार ६४१ बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली आहे. त्याची आकडेवारी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसने नुकतीच जाहीर केली आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षीत, तंत्रज्ञान आदी विविध प्रकारच्या पदवी, पदविका आदींचे शिक्षण घेतलेल्या तरुणांचा समोवश आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्यांमध्ये सर्वाधिक तरुण हे ग्रामीण भागातील असून त्याखालोखाल शहरी भागातील आहेत.
राज्यातील जिल्ह्यामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या जळगाव जिल्ह्यातील आहे.
अकोला- १,००,४०७
अमरावती-१,१९,७४०
छ.संभाजीनगर-१,५४,४४७
नाशिक -१,४७,४९७
पुणे-१,३८,८४४
बुलडाणा-१,४६,५५५
जळगाव-१,७४,२२९
नागपूर-१,५२,८५७