Jagdish Patil
महाराष्ट्रात 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
बीएलओ घरी येण्यापूर्वी शक्य असल्यास voters.eci.gov.in वेबसाईठवरून मतदारांनी मागील SIR तपशील तपासून ठेवण्याचं आवाहन आयोगाने केलंय.
बीएलओने दिलेल्या गणना अर्जात आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी करावी आणि त्याची एक प्रत बीएलओकडे जमा करा.
तर अर्ज जमा केल्यानंतर BLO कडून पोचपावती घेण्याचं आणि अर्जाची एक प्रत स्वत:जवळ ठेवण्यासह आयोगाने सांगितलं आहे.
तुमचे किंवा किटुंबियांचे नाव मागील SIR यादीत नसल्यास आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्यास आयोगाने सांगितलं आहे.
त्यामध्ये जन्म दाखला, पासपोर्ट, दहावीचे प्रमाणपत्र किंवा इतर शैक्षणिक प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाईल.
रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक ओळखपत्रांचा वापर करता येईल.
कुटुंब नोंदवही, शासनाकडून मिळालेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र तसेच वनहक्क प्रमाणपत्र देखील स्वीकारले जाईल.Sarkarnama
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आधार कार्ड ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.
मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करण्याचंही आवाहन आयोगाने केलं आहे.