Aslam Shanedivan
भोंदूबाबा अशोक खरात याने केलेले कारनामे समोर आल्याने संपूर्ण राज्यातील वातावरण तापले आहे.
खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले आहेत.
यावरून त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असून आता या रिक्त झालेल्या पदावर नियुक्तीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे
महायुतीमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे.
या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील चार महिला नेत्यांची नावे समोर आली असून एका नावांवर एकमत होण्याची शक्यता आहे
चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांचे नाव आघाडीवर आहे
तसेच आता महिला आयोगाचे अध्यक्षपद रिकामे झाल्याल्यानंतर आता या पदासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील वैशाली नागवडे यांचेही नाव रेसमध्ये आहे
तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाणार? याची चर्चा रंगली असतानाच पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचेही नाव चर्चेत आहे
तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांची नावे चर्चेत आहे.