Fake Godman Arrested : अशोक खरातची कोट्यवधींची माया; 60 हून अधिक सातबारे समोर...

Pradeep Pendhare

खरातची कोट्यवधींची माया

राज्यातील मंत्री व बड्या राजकीय नेत्यांच्या भविष्य कथनाने नावारुपास आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे डोळे दीपवणारी संपत्ती समोर आली आहे.

Fake Godman Arrested | Sarkarnama

भूखंड खरेदीचा सपाटा

नाशिक शहरासह सिन्नर, अहिल्यानगरमधील शिर्डी, राहाता, निघोज, निमगाव कोऱ्हाळे, पाथर्डी इथं शेकडो कोटीचे भूखंड आणि शेत जमिनी त्याच्यासह कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलं.

Fake Godman Arrested | Sarkarnama

शासकीय अधिकाऱ्यांशी भागीदारी

भूखंड खरेदी-विक्रीत सरकारी अधिकारी आणि त्याचे कुटुंब भागीदार असल्याचं समोर आलं आहे.

Fake Godman Arrested | Sarkarnama

पत्नी, मुलीच्या नावावर मालमत्ता

अशोक खरातसह पत्नी कल्पना, मुलगी तृप्तबाला तसेच नातेवाईकांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केलेल्या असून, त्याच्या किंमती शेकडो कोंटीच्या घरात आहेत.

Fake Godman Arrested | Sarkarnama

उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नी भागीदार

पाथर्डी इथं एक एक जमिनीच्या सातबारा उताऱ्यात खरातच्या मुलीसोबत ठाणे इथले उपजिल्हाधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीने नाव समोर आले आहे.

Fake Godman Arrested | Sarkarnama

60 हून अधिक सातबारे

भोंदुगिरी करताना दुसरीकडे अशोक खरात याचा जमिनी खरेदी-विक्रीचा मुख्य उद्योग होता. आतापर्यंत खरातच्या मालमत्तेचे 60 हून अधिक सातबारे समोर आले आहेत.

Fake Godman Arrested | Sarkarnama

16 भूखंड...

अशोक खरातची पाथर्डी, विल्होळी व गौळाणे भागात सुमारे 16 भूखंड आणि सहा एकरच्या आसपास शेत जमीन आहे. आडगाव इथंही भूखंड आहे.

Fake Godman Arrested | Sarkarnama

फार्म हाऊस अन् शेत जमीन

सिन्नर इथं ईशानेश्वर मंदिर असून, फार्म हाऊस आणि तिथं विस्तीर्ण क्षेत्रावर आंब्याची बाग आहे. तिथं 21 एकर शेत जमीन असून खरात याने आजूबाजूची जमिनी घेण्याचा सापाटा सुरू केला होता.

Fake Godman Arrested | Sarkarnama

मिरगावमध्ये 50 एकर जमीन?

अशोक खरातचे ईशानेश्वर मंदिर असलेल्या मिरगावमध्ये सुमारे 45 ते 50 एकर जमीन असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Fake Godman Arrested | Sarkarnama

NEXT : भोंदूबाबा ते अटकेपर्यंत...

येथे क्लिक करा :