Jagdish Patil
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे.
या उपक्रमामुळे पात्र महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणं सोपं होणार आहे.
तसंच कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा अशा शासकीय योजनांचा लाभ महिला शेतकऱ्यांना सहज मिळण्यास मदत होणार आहे.
तर महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज तसा करायचा आणि त्याचे निकष काय आहेत ते जाणून घेऊया.
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं, तुम्ही शेती किंवा शेतीशी पूरक कामे करण गरजेचं आहे.
वर्षातील किमान एका हंगामात महाराष्ट्रात शेती केली पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या गावी किंवा राज्याबाहेर स्थलांतर केली तरी तुम्ही पात्र ठराल.
स्वतःची जमीन नसेल आणि तुम्ही शेतमजुरी करता, जनावरांची निगा राखत असाल रोपवाटिकेत काम करत असाल तरीही तुम्ही पात्र आहात.
महिला कृषी विभागाच्या https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.
वेबसाईटवर आधार कार्ड क्रमांक, आधार कार्डवरील नाव, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक ही माहिती भरावी.
ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या महिला शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.