वडनगर ते तिसऱ्यांदा PM..! हे आहेत नरेंद्र मोदींच्या राजकीय वाटचालीतील 10 महत्वाचे टप्पे

Rajanand More

वडनगर ते RSS

गुजरातमधील वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुळ गाव. तरुण वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर १९७२ मध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये RSSचे प्रचारक म्हणून काम सुरू केले. इथेच त्यांच्या राजकीय आयुष्याची पायाभरणी.

Narendra modi | sarkarnama

आणीबाणी

आणीबाणीच्या काळात पीएम मोदी हे सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी भूमिगत पद्धतीने संघटनात्मक काम केले होते. याच काळात त्यांच्या संघटनकौशल्याची कसोटी लागली होती.

PM Narendra Modi

भाजपमध्ये एन्ट्री

RSS मधून त्यांची गुजरातमध्येच भाजपच्या राजकारणात एन्ट्री झाली. १९८७ मध्ये मोदींनी गुजरात भाजपमध्ये कामास सुरुवात. १९९० आणि १९९५च्या विधानसभा निवडणुकांही त्यांच्यासाठी महत्वाच्या ठरल्या.

BJP | Sarkarnama

देशाच्या राजकारणात

गुजरातमधून १९९५ मध्ये त्यांचे दिल्लीच्या राजकारणात आगमन झाले. १९९५ नंतर त्यांना हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली. १९९८च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी देशभरात संघटनपातळीवर काम केले.

narendra modi | sarkarnama

मुख्यमंत्री

ऑक्टोबर २००१ मध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले. मोदींच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा टप्पा म्हणता येईल. तेव्हापासून ते सरकारचे प्रमुख म्हणून सलग २५ वर्षे काम करत आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

गुजरात मॉडेल

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर काही महिन्यांतच गोध्रा दंगल घडली आणि मोदी सरकारवर चोहोबाजूने टीका झाली. त्यानंतर मोदींनी विकासाचे गुजरात मॉडेल विकसित करत आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला.

Narendra Modi | Sarkarnama

पंतप्रधान पदाचे उमेदवार

२०१२ मध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री. त्याचवेळी राष्ट्रीय राजकारणातील प्रभाव वाढत गेल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भाजपकडून घोषणा करण्यात आली.

PM Narendra Modi | Sarkarnama

मोदी सरकार

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा जिंकत भाजपने देशात पहिल्यांदाच एकहाती सत्ता काबीज केली. मोदींनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

Modi Sarkar 3.0 | Sarkarnama

वरचढ कामगिरी

भाजपने २०१९ च्या निवडणुकीत २०१४ पेक्षा वरचढ कामगिरी करत तब्बल ३०३ जागा जिंकल्या. देशासमोर विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि पायाभूत सुविधांचे मॉडेल ठेवत त्यांनी विजय मिळविला.

Modi Government | Sarkarnama

तिसऱ्यांदा पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०२४ च्या निवडणुकीतही मित्रपक्षांना सोबत घेत सत्ता स्थापन केली. तर मोदींनी ९ जून २०२४ रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : परराष्ट्रमंत्र्यांच्या एका फोटोने वेधले लक्ष, 'ब्युटी क्वीन'चा असा आहे प्रवास...

येथे क्लिक करा.