Rashmi Mane
महाराष्ट्रात सुरू होत आहे भारत गौरव पर्यटक रेल्वे—भारतीय रेल्वेने सुरू केलेली 'भारत गौरव ट्रेन' ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणारी एक विशेष पर्यटक रेल्वे आहे.
ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमी जीवनाशी संबंधित ठिकाणांना भेट देते. जसे की रायगड, प्रतापगड, अजिंक्यतारा आणि पन्हाळा.
भारत गौरव ट्रेनमध्ये आधुनिक सोयीसुविधा, आरामदायक आसनव्यवस्था आणि इन-कोच एंटरटेनमेंटच्या माध्यमातून प्रवाशांना मराठा इतिहासाची झलक अनुभवता येते.
या गौरवगाथेचा पहिली ट्रेन 9 जून पासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये ऐतिहासिक किल्ल्यांची सफर घडवण्यात येईल.
ही ट्रेन केवळ पर्यटन नाही, तर आपल्या इतिहासाची जाणीव करून देणारी एक देशभक्तिपर अनुभवयात्रा ठरते.
ट्रेन मुंबई/पुणे येथून सुरु होऊन कोल्हापूर, सातारा, रायगड, नाशिक व औरंगाबाद यांसारख्या ठिकाणी थांबते.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) सहा दिवसीय सहलीचे आयोजन केले आहे.