S. Jaishankar : जयशंकर यांना मिळालं सर्वोच्च संरक्षण; Z+ सुरक्षा म्हणजे नेमकं काय?

Rashmi Mane

पहलगाम दहशतवादी हल्ला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

Z plus security | Sarkarnama

सुरक्षा कडक व्यवस्था

हा निर्णय गृह मंत्रालयाने (MHA) घेतला आहे. त्याच्या सुरक्षेत आता एक बुलेटप्रूफ कार देखील समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाभोवतीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Z plus security | Sarkarnama

झेड श्रेणीची सुरक्षा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना आधीच झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेसाठी नेहमीच ३३ कमांडो तैनात असतात, ज्यामध्ये सीआरपीएफ कमांडो देखील असतात.

Z plus security | Sarkarnama

झेड श्रेणीच्या सुरक्षेत काय काय असते जाणून घेऊया?

Z-कॅटेगरी सुरक्षा भारतीय सुरक्षा व्यवस्थेतील एक उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे, सहसा, ही सुरक्षा अशा व्हीव्हीआयपी लोकांना दिली जाते ज्यांना त्यांच्या पदामुळे आणि परिस्थितीमुळे जास्त धोका असतो.

Z plus security | Sarkarnama

सुरक्षा साधनांची व्यवस्था

या सुरक्षा स्तरांतर्गत संबंधित व्यक्तीस 22 सुरक्षा कर्मचारी, एक अॅक्शन टीम, पोलिस वाहन आणि इतर सुरक्षा साधनांची व्यवस्था केली जाते.

Z plus security | Sarkarnama

एस्कॉर्ट वाहनांचाही समावेश

गुप्तचर संस्था धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर ही सुरक्षा प्रदान करतात. या श्रेणीतील सुरक्षेत किमान ४ ते ६ एनएसजी कमांडो (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक) आणि पोलिसांचाही समावेश आहे. 'झेड' श्रेणीच्या सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट वाहनांचाही समावेश आहे.

Z plus security | Sarkarnama

झेड-श्रेणी सुरक्षा कोणाला मिळते?

ज्यांच्याबद्दल सुरक्षा एजन्सींना धोक्याची माहिती आहे त्यांना झेड-श्रेणीची सुरक्षा दिली जाते. यामध्ये केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मोठे नेते किंवा मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.

Z plus security | Sarkarnama

Next : डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार इतिहासातील सर्वात महागडे गिफ्ट! किंमत वाचून बसेल धक्का!

येथे क्लिक करा