सरकारनामा ब्यूरो
बिहार केडरचे धडाकेबाज IPS अधिकारी शिवदीप लांडे हे राजकारणात प्रवेश करणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील अकोल्याचे रहिवासी असलेल्या IPS शिवदीप लांडे यांनी गेल्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
IPS लांडे यांनी निवृत्ती घेताना घोषणा केला होती की, ते बिहार सोडून जाणार नाहीत आणि आज त्याचं बिहारमधून त्यांनी राजकीय आखाड्यात एन्ट्री घेतली आहे.
बिहारमध्ये त्यांनी 'हिंद सेना' नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
विधानसभेच्या 243 जागांवर आमच्या पक्षाचा कोणीही उमेदवार असला तरी प्रत्येक मतदारसंघात शिवदीप लांडेच त्यांच्या रूपाने निवडणूक लढणार आहे, असं ते म्हणाले आहेत.
शिवदीप लांडे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आहेत. सासऱ्याच्या पाठोपाठ तेही राजकरणात येत असल्याने त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.
2006 बॅचच्या शिवदीप लांडे हे पटनामधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना 'सुपर कॉप' शिवदीप, 'सिंघम' या नावानी ओळखले जाते.
माजी IPS शिवदीप लांडे यांची धडाकेबाज कामगिरीसाठी संपूर्ण देशभरात ओळख आहे. आता राजकारणात एन्ट्री घेत राजकारण गाजवतील का? याबाबत उत्सुकता वाढली आहे.