Roshan More
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ दिल्लीत असून 'राजघाट' नावाने ते प्रसिद्ध आहे.
मुंबईतील दादार भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ 'चैत्यभूमी' नावाने ओळखले जाते
दिल्लीमधील माजी पंतप्रधान पंडित नेहरुंच्या समाधीस्थळाला 'शांतीवन' म्हणतात.
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ 'विजयघाट' नावाने ओळखले जाते.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधन 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाले. त्यांचे समाधीस्थळ 'शक्तिस्थळ' नावाने परिचित आहे.
शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या समाधीस्थळाला 'किसानघाट' म्हणून संबोधतात.
बिहारमधील पटना येथे देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे समाधीस्थळ आहे. ते 'महाप्रयानघाट' नावाने प्रसिद्ध आहे.