Akshay Sabale
'सकाळ माध्यम समूहा'च्या राज्यव्यापी सर्वेक्षणात प्रत्येक पक्षाबद्दल मतदारांनी भावना व्यक्त केल्या.
महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांबाबत मतदार वेगळा विचार करत असल्याच सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी विधानसभेला वेगळी निवडणूक लढवावी का? असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यात 35 टक्के मतदारांनी 'मविआ'तील तीनही घटक पक्षांनी वेगळी निवडणूक लढवावी, असं मत मांडलं आहे.
40 टक्के मतदारांनी 'मविआ'तील घटक पक्षांनी वेगळी निवडणूक लढू नये, असं म्हटलं आहे. तर, 24.7 टक्के मतदारांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं आहे.
महायुतीतील तीनही पक्षांनी विधानसभेला वेगळी निवडणूक लढवावी का? या प्रश्नावर 40.4 टक्के मतदारांनी हो असं मतं मांडलं आहे.
तर, 30.5 टक्के मतदारांनी महायुतीने वेगळी निवडणूक लढू नये, असं उत्तर दिलं आहे. तसेच, 25.4 टक्के मतदारांनी सांगता येत नाही, असं म्हटलं आहे.