सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.
काल EVM विरोधात आंदोलन केल्यानंतर आज महाविकास आघाडीने बीड जिल्ह्यातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
दुसरीकडे परभणीमध्ये आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने घेतलेला बळी या दोन घटनेसाठी महाविकास आघाडीने विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.
परभणी येथील संविधानाच्या प्रतीच्या विटंबना झालेल्या घटनेचा महाविकास आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रात घडलेल्या घटनेसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर माविआच्या नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी ''अटक करा, अटक करा गुन्हेगारांना अटक करा'',''गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कर असो", अशा घोषणा दिल्या.
'माहिती सुसाट', 'आरोपी मोकाट', 'अटक करा बीडच्या गुन्हेगारांना अटक करा', अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारच्या दडपशाहीमुळे संविधानाच्या विटंबनाविरोधात लढाई लढत असलेल्या दलित समाजातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांचा मृत्यू झाला असल्याची, गंभीर टीका दानवे यांनी यावेळी केली.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, प्रतोद आमदार उत्तमराव जानकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप क्षीरसागर आणि महाविकास आघाडीतील इतर विधिमंडळातील सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.