सरकारनामा ब्यूरो
विधान परिषद आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने विधानसभेच्या महिला मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या स्वागत समारंभासाठी नागपूर विधान भवन येथे उपसभापती कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांच पुष्पगुच्छ, सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देत चित्रा वाघ आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील उपस्थित होत्या.
कन्नड सोयगाव मतदारसंघातून निवडणूकीत पहिल्यांदाच विजयी झालेल्या संजना जाधव यांचे पुष्पगुच्छ देत चित्रा वाघ स्वागत केले.
अनुराधा चव्हाण या पहिल्यांदा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांचाही याठिकाणी सन्मान करण्यात आला.
भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण यांना सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केल गेलं.
साक्री विधानसभेच्या विद्यमान आमदार मंजुळा गावीत निलम गोऱ्हे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
अणुशक्तीनगर विधानसभेच्या सदस्या सना मल्लिक यांचेही स्वागत करण्यात आले.
निलम गोऱ्हे
या कार्यक्रमावेळी बोलताना आगामी काळात बालविवाह, कौटुंबिक छळ विरोधी कायदा आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन निलम गोऱ्हे यांनी केले.