सरकारनामा ब्यूरो
राजकरणात काही होवू शकता असतं म्हटलं जात याचंच उदाहरण आहेत मंत्री प्रेमचंद अग्रवाल. ज्यांना फक्त एका वाक्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.काय आहे कारण वाचा…
वादग्रस्त वक्तव्या केल्याने उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री प्रेमचंद अग्रवाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेराव घातला त्यामुळे त्यांनी अखेर रविवार (ता.16) रोजा त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
प्रेमचंद अग्रवाल यांच्या राजीनाम्याने उत्तराखंडमधील राजकीय वातावरण पेटले आहे.
गेल्या महिन्यात 21फेब्रुवारीला विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदीय कामकाज मंत्री असलेल्या अग्रवाल यांनी सभागृहात विरोधी पक्षाच्या स्थगन सूचनेला उत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केलं.
उत्तराखंड राज्य हे फक्त पहाडी लोकांचे नाही, असे वक्तव्य अग्रवाल यांनी केले होते. ते पहाडी आणि इतर लोकांमध्ये भेदभाव करतात, असे आरोप विरोधकांकडून करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अग्रवाल यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली होती. मात्र, त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना राज्यातून विरोध होत होता.
राज्यातील अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी अग्रवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
अग्रवाल यांनी 1994 पासून उत्तराखंड राज्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. तसेच त्यांच्या विधानाचा अर्थ अजिबात चुकीचा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले.