Pradeep Pendhare
दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मुंबई इथं स्मारक उभारण्यात येणार
हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (सातारा) इथं स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार
पुण्यातील आंबेगावमधील शिवसृष्टीच्या चौथ्या टप्प्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक इथल्या बलिदानस्थळी स्मारक उभारले जाणार
मुंबई दादरच्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधीची तरतूद
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव (सांगली) इथं स्मारकासाठी निधीची तरतूद केलेली आहे.
पुण्यातील संगमावाडी इथं वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होणार आहे.
आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जागा घेणार
कोकणातील संगमनेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले होते. तिथं स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारले जाणार
मराठा सैन्याच्या पराक्रमाची साक्ष म्हणून पानिपत इथं स्मृती स्मारकासाठी हरियाना सरकारकडून जागा उपलब्ध करून घेणार