Deepak Kulkarni
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक मंगळवारी (ता.14) मंत्रालयात पार पडली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि दिवाळीपूर्वी झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महायुती मंत्रिमंडळाच्या या बैठकीत उद्योग विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,विधी व न्याय विभाग या तीन महत्त्वाच्या विभागांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या 'द पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या विकासासाठी 500 कोटींच्या निधींची तरतूद असलेली योजना तयार करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात 2 हजार 228 पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे. धोरण कालावधीत 50 हजार कोटींची गुंतवणूक, 5 लाखांवर रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.
महायुती सरकारच्या निर्णयामुळे बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.