Deepak Kulkarni
महायुती सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६' च्या निकषांमध्ये मोठी सुधारणा आणि शिथिलता आणली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील तब्बल २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महायुती सरकारच्या पूर्वीच्या (२०१९) कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफीची अट होती.
पावसाळी अधिवेशनात घोषणा केल्यानंतर मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत आता ही मर्यादा रद्द करून त्यांना २ लाख रुपयांपर्यंतची पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकारकडून यापूर्वी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट घालण्यात आली होती.
फडणवीस सरकारने आता ती अट रद्द करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी २०२५-२६ मध्ये परतफेड केली आहे, ते सुद्धा आता या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
सरकारच्याा या निर्णायक बदलामुळे पहिल्यांदाच मागील योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाही नवीन कर्जमाफीच्या कक्षेत आणले आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पात्र शेतकऱ्यांना 30 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
मंत्री भरणेंनी ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी असून इनकम टॅक्स भरणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांसाठी नसल्याचंही म्हटलं आहे.