Pradeep Pendhare
गणेशाचं उत्सवाची सर्वत्र धूम असून, लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गोडधोडाचा नैवेद्य बनवला जात आहे. मंत्री आदिती तटकरे बाप्पांच्या नैवेद्यासाठी स्वयंपाक घरात रमलेल्या दिसल्या.
राज्यातील युवा मंत्री म्हणून राष्ट्रवादीमधील आदिती तटकरे यांची ओळख आहे.
आदिती तटकरे यांच्याकडे महायुती सरकारमध्ये महिला व बालविकास खात्याची जबाबदारी आहे.
रायगड जिल्ह्यातील राज्याचं प्रतिनिधीत्व करताना, महायुतीमधील मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर त्यांचा राजकीय संघर्ष चर्चेत आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि एनसीपी मंत्री आदिती तटकरे यांच्यातील छुपा राजकीय संघर्षाचा अलीकडच्या काळात उद्रेक झाला आहे.
रायगडचे पालकमंत्रीपद संभाळताना, विरोधकांकडून लक्ष्य करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची यशस्वी अंमलबजावणी आदिती तटकरे करताना दिसत आहे.
कोकणात गणेशोत्सवाची विशेष परंपरा असल्याने लाडक्या बाप्पासाठी घरोघरी उकडीचे मोदक बनवले जातात.
नेहमी राजकारणात सक्रिय असलेल्या आदिती तटकरे यांनी वेळ काढत लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी उकडीचा मोदक बनवला.
मंत्री आदिती तटकरे बनवत असलेल्या उकडीचे मोदकचे व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यांचं राजकारणापलीकडच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.