सरकारनामा ब्यूरो
देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानांवर मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर अजित पवार, एकनाथ शिंदे हे यांनीही उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती होती. तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना देखील शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले होते.
शपथविधी सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा हे देखील शपथविधीसाठी उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही उपस्थिती.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनीही या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली.
चंद्राबाबू नायडू यांनीही शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती.
या सोहळ्यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी उपस्थिती लावली.