Mangesh Mahale
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, प्रमोद जठार, रवींद्र चव्हाण यांची नावे या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत.
2009 मध्ये कॉंग्रेसचे नीलेश राणे निवडून आले होते. 2014 मध्ये राणेंचा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला.
विनायक राऊतांनी 2019 मध्ये नीलेश राणेंचा पराभव केला. राऊतांना 4 लाख 58 हजार मते मिळाली होती.
2019 च्या निवडणुकीत नीलेश राणे यांना 2 लाख 79 हजार 700 मते मिळाली होती.
नीलेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडून विविध पोस्ट व्हायरल होत आहेत.
राणेंच्या उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्यांनी कॅपेनिंग सुरू केले आहे.
सुरुवात नवीन पर्वाची, निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा, नवा ध्यास नवा विचार, जनसामान्याचा नेता, संपर्कात असणारा ओळख ठेवणारा आपला हक्काचा माणूस अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला हा मतदारसंघ आहे.
बॅरिस्टर नाथ पै, मुधु दंडवते अशा दिग्गजांचा मतदारसंघ म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ. गडचिरोलीनंतर सर्वात संवेदनशील लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळख.
NEXT :कोर्टातील पट्टेवाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; सुशीलकुमार शिंदेंची चढती राजकीय कमान