Jagdish Patil
शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत वाद नवा वाद सुरु झाला आहे.
"आपण हाडाचा शिवसैनिक असून काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं कधी जमलं नाही. मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर येताच उलट्या होतात," असं सावंत म्हणाले
सावंतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. तर आतापर्यंत अजितदादांविरोधात युतीतील नेत्यांनी काय वक्तव्यं केली आहेत ती पाहूया.
सावंतांच्या वक्तव्यामुळे युतीतील वातावरण तापलं असातनाच भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनीही अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
"दुर्देवाने अजित पवार गटाशी युती झाली, ही युती ना त्यांना पटली, ना आम्हाला. अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग" असं ते म्हणाले.
अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादीने भाजपच्या खासदाराला पाडल्याचा गंभीर आरोपही होकेंनी केला.
भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोतांनी अजित पवारांशी जुळवून घेणं अशक्य असल्याचं म्हटलं होतं.
भाजपचे शिरूर तालुका उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीतून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
महायुतीतील नेत्यांनीच अजित पवारांवर टीका केल्यामुळे आगामी विधानसभेत युतीचे नेते एकमेकांचं काम प्रमाणिकपणे करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.