Aslam Shanedivan
राज्याच्या राजकारणात आपल्या कामाच्या शैलीसाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ओळखल्या जातात.
दरम्यान पंकजा मुंडे यांचा नुकताच वेगळाच अंदाज समोर आला असून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
राजकीय व्यस्ततेतून वेळ काढत सामाजिक संदेशासाठी त्या थेट रॅम्पवर उतरल्या असून त्यांच्या मॉडेलसारख्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.
आता या रॅम्प वॉकमागचा खुलासा स्वतः पंकजा मुंडे यांनीच केला असून यामागचे कारण ही त्यांनी सांगितले आहे.
मुंबईतील ग्रँड हयात येथे आयोजित प्रतिष्ठित फॅशन शोमध्ये त्यांनी रॅम्प वॉक केला.
बॉम्बे टाईम्सच्या फॉशन वीकसाठी त्यांनी हे रॅम्प वॉक केलं असून 'वॉक फॉर अ कॉझ' अंतर्गत आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या.
पर्यावरणावरला पोषक असलेल्या फॅशनसाठी त्यांनी रॅम्प वॉक केल्याचे त्यांनी म्हटले असून त्यांनी रॅम्प वॉक करत उपस्थितांचं लक्ष वेधलंय.
मुंडे यांनी हॅडलूमची साडी घालून हॅण्डलूमला प्रमोट करण्यासाठी हा रॅम्प वॉक केल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
पर्यावरणाचा समतोल राखणे आणि हवामान बदलाच्या आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा उद्देश या ‘वॉक फॉर अ कॉज’ चा होता.