राज ठाकरेंची नात अन् अमित ठाकरेंच्या कन्येचं 'बारसं'; काय ठेवलं नाव..?

Deepak Kulkarni

मोठं नाव..

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय वारसा लाभलेलं लोकप्रिय नेत्यांच्या यादीत टॉपचं नाव म्हणून राज ठाकरे यांचं घेतलं जातं.

Raj Thackeray Amit Thackeray | Sarkarnama

'शिवतीर्थ'वर आनंद...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ'वर सध्या आनंदाचं वातावरण आहे.

Raj Thackeray Family | Sarkarnama

विवाह

याच राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरे हे नेहमीच मोजकंच बोलणं आणि मीडियापासून लांब राहणं पसंत करतात. त्यांचा विवाह मिताली यांच्याशी 27 जानेवारी 2019 रोजी पार पडला होता.

Raj Thackeray Mitali Thackeray | Sarkarnama

दोन नातू

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दोन नातू आहेत.

Amit Thackeray Family | Sarkarnama

मुलाचे नाव कियान

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांना पहिला मुलगा झाला. त्यांच्या मुलाचे नाव किआन असे ठेवले आहे.

Amit Thackeray Family | Sarkarnama

नातवासोबतचे फोटो

किआनच्या आगमनाने ठाकरे कुटुंबात प्रचंड आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. राज ठाकरे यांचे नातवासोबतचे फोटो अनेकदा समोर आले आहेत.

Amit Thackeray Family | Sarkarnama

चार वर्षांनंतर कन्या

चार वर्षांनंतर अमित ठाकरे हे दुसऱ्यांदा बाबा तर राज ठाकरे आजोबा झाले आहेत. अमित ठाकरेंना सप्टेंबर महिन्यात कन्यारत्न झाले आहे.

Amit Thackeray Family | Sarkarnama

नामकरण सोहळा

अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांच्या मुलीचं रविवारी(ता.1 नोव्हेंबर) नामकरण (बारसं) सोहळा पार पडला.

Amit Thackeray Family | Sarkarnama

'अहिल्या'

राज ठाकरेंच्या नातीचं नामकरण 'अहिल्या' असं ठेवण्यात आलं आहे.

Raj Thackeray GrandDaughter Naming Ceremony | Sarkarnama

आनंद द्विगुणित

किआनच्या जन्मानंतर 4 वर्षांनी ठाकरे कुटुंबात आगमन झालेल्या चिमुकलीमुळे ठाकरे कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. अहिल्या नाव लोकांच्या पसंतीस पडत आहे.

Raj Thackeray GrandDaughter Naming Ceremony | Sarkarnama

NEXT: स्वीकृत नगरसेवकाला असतात 'या' दोन मर्यादा, माहिती आहेत का?

History-of-Mahapaur-Word.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...