Rashmi Mane
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीने गुरुवारी (12 डिसेंबर) दिल्लीतील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.
दिल्लीत सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये प्रति महिना मानधन देण्याची घोषणा त्यांनी केली.
या योजनेला 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' असे नाव देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी महिलांना दरमहा १००० रुपये देण्याचे बोलले होते, मात्र आता ही रक्कम वाढवण्यात आली आहे.
ज्या महिला करदात्या नाहीत.
ज्यांना कोणत्याही सरकारी योजनेंतर्गत पेन्शन मिळत नाही.
18 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
दिल्लीचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.