Rajanand More
बलूचिस्तानातील 32 वर्षांची तरुणी महरंग बलोच सध्या खूप चर्चेत आली आहे. तिला पाकिस्तानी लष्कराच्या आदेशानुसार अटक करण्यात आले आहे. 2023 पासून पाकिस्तानी लष्कराविरोधात अधिक आक्रमक होती.
टाईम्स मॅगझिनने जगातील उभरत्या नेत्यांच्या यादीत तिला स्थान दिले आहे. तसेच बीबीसीनेही 100 प्रभावशाली महिलांमध्ये तिचा समावेश केला आहे.
महरंगला बलुचिस्तानची वाघीण म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात तिने लढा उभा केला आहे. अमेरिकेपासून संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत तिने आवाज उठवला आहे.
महरंग हिचा जन्म बलुचिस्तानमध्येच झाला आहे. ती पेशाने डॉक्टर असून तिने सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच तिने काम सुरू केले आहे.
महरंगला पाच बहिणी असून एक भाऊ आहे. तिचे वडील अब्दुल गफार बलूचमध्ये एक मजूर आणि डाव्या विचारांचे राजकीय कार्यकर्ते होते.
पाकिस्तानी लष्कराने तिच्या वडिलांना 2009 मध्ये नेले होते. त्यानंतर 2011 मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी महरंग 16 वर्षांची होती. तेव्हापासूनच तिने लष्कराविरोधात लढण्याचा निर्धार केला.
महरंगच्या भावालाही 2017 मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी मात्र त्यांनी मोठे आंदोलन उभारले. त्यामुळे त्यांच्या भावाला लष्कराकडून तीन महिन्यांनी सोडून देण्यात आले.
बलूच यकजेहती समितीची नेता असलेल्या महरंगला नुकतीच क्वेटामध्ये अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून ती कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. लष्कराविरोधातील आंदोलनामुळेच तिला अटक झाली आहे.