Rajanand More
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी परदेशात गुपचूप लग्न केल्याचे समोर आले आहे. चारवेळच्या माजी खासदारासोबत त्यांनी लग्न केलं आहे.
पिनाकी मिश्रा हे महुआ यांचे पती आहेत. ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघाचे ते चारवेळा खासदार होते. पहिल्यांदा काँग्रेस तर नंतर तीनदा बीजेडीच्या तिकीटावर ते निवडून आले होते.
पिनाकी यांनी 1996 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीनदा निवडून आले.
पिनाकी मिश्रा यांचे हे दुसरं लग्न आहे. 66 वर्षांच्या मिश्रा यांचा 1984 मध्ये संगिता मिश्रा यांच्याशी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुलंही आहेत.
मिश्रा हे मुळचे ओडिशातील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण घेतले असून ते सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील म्हणून ओळखले जातात.
महुआ मोइत्रा यांच्यावर संसदेतील पैशांच्या बदल्यात पैसे या प्रकरणात खासदारकी गेली होती. या प्रकरणात पिनाकी यांचेही नाव आले होते. तसेच त्यांनी महुआ यांना शासकीय बंगल्यात राहू द्यावे, यासाठी पिनाकी यांनी कोर्टात बाजू मांडली होती.
पिनाकी यांना बीजेडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही. महुआ प्रकरणात नाव आल्याने त्यांचे तिकीट कापल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
महुआ पिनाकी यांच्यातील नात्याचे गुपित लग्नानंतरच समोर आले आहे. त्यांनी ३ जून रोजी जर्मनीत विवाह केल्याचे सांगितले जात आहे.