Rajanand More
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती आहेत. हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार त्यांची एकूण संपत्ती 9.55 लाख कोटी रुपये एवढी आहे.
अंबानी कुटुंबीयांची लक्झरी लाइफस्टाईल नेहमीच चर्चेचा विषय असते. अंबानींचे मुंबईतील एंटिलिया या घराची किंमत तब्बल 16,640 कोटी एवढी आहे.
त्यांच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत. त्यामध्ये रोल्स रॉईस, मर्सिडीज, फेरारी यासारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. रोल्स रॉईस या बुलेटप्रुफ कारची किंमत 17 कोटी एवढी आहे.
अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्याकडे अमाप संपत्ती असल्याने ते दररोज घरातून बाहेर पडताना खिशात किती रोकड किंवा क्रेडिट कार्ड्स घेऊन जात असतील, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिले आहे.
एका मीडियाच्या कार्यक्रमात बोलताना अंबानी म्हणाले होते की, त्यांच्यासाठी पैसा महत्वाचा नाही. संसाधनांच्या रुपाने पैसा कंपनीला जोखीम घेण्यासाठी मजबूत बनवतो, असे ते मानतात.
घरातून बाहेर पडताना आपल्या खिशात कधीही पैसे किंवा एकही क्रेडिट कार्ड नसते, असे अंबानी यांनी सांगितले होते. आपल्यासोबत कोणी ना कोणी असते, ते बिल भरतात, असे त्यांनी सांगितले होते.
आपल्याकडे पैसे किंवा क्रेडिट कार्ड न ठेवण्याची ही सवय पहिल्यापाहूनच असल्याचेही त्यांनी सांगितले होते. शाळेत असो वा कॉलेजमध्ये, आपण पॉकेट मनी म्हणून कधीच पैसे घेतले नाही. आपल्याकडे क्रेडिट कार्डही नव्हते, असेही त्यांनी सांगितले होते.
मीडिया किंवा लोकांकडून आपल्याला एखादे लेबल लावण्यात आले किंवा उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले तर ते आपल्याला अजिबात आवडत नाही, असेही मुकेश अंबानी म्हणाले होते.