Vijaykumar Dudhale
रावसाहेब दानवे राजकारणातील ग्रामीण ढंगाचं मोकळ ढोकळं व्यक्तिमत्व आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रावसाहेब दानवे सध्या निवांत आहेत. ते सध्या आपल्या मतदारसंघात फिरत आहेत
रावसाहेब दानवे यांनी आज भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे मका पार्टी केली.
रावसाहेब दानवे यांनी स्वतः मक्याची कणसे, भुईमुगाच्या शेंगा भाजल्या अन् गावकऱ्यांसोबत हुरडा खाण्याचा आनंद लुटला
मक्याची कणसे भाजताना विस्तव विझल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी गमजाच्या साहाय्याने तो विस्तव ग्रामीण ढंगात फुलवला आणि त्यावर कणसे भाजली
त्या विस्तवावर रावसाहेब दानवे यांनी कणसे भाजून सहकाऱ्यांनाही खाऊ घातली आणि स्वतःही गरमागरमा कणसांवर ताव मारला
रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री असतानाही त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अशीच मैफिल रंगायची
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पारंपारिक पद्धतीन बैलपोळाही साजरा केला