Roshan More
देशातील कोट्यवधी रेशनधारकांसाठी केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक 2026 चा मसुदा जाहीर झाला आहे.
नव्या प्रस्तावानुसार रेशन वाटपाच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे.
सध्या अंत्योदय अन्न योजनेत पात्र कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य मिळते. मात्र, नव्या प्रस्तावानुसार आता कुटुंबाऐवजी प्रत्येक व्यक्तीच्या आधारावर धान्य दिले जाऊ शकते.
नव्या मसुद्यानुसार लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 7 किलो धान्य देण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे.
कुटुंबातील सदस्यसंख्या लक्षात घेऊन धान्य निश्चित केले जाईल, पण एका कुटुंबाला मिळणाऱ्या धान्याची कमाल मर्यादा 35 किलोच राहणार आहे.
सध्या लहान कुटुंबांना प्रति व्यक्ती अधिक धान्य मिळते, तर मोठ्या कुटुंबांत सदस्यांच्या वाट्याला कमी धान्य येते. हा असमतोल दूर करून सर्वांना समान लाभ देणे हा यामागचा उद्देश आहे.
हा प्रस्ताव लागू झाल्यास रेशन वितरणात अधिक पारदर्शकता येईल. विशेषतः गरजू आणि मोठ्या कुटुंबांना त्यांच्या सदस्यसंख्येनुसार अधिक न्याय्य धान्य मिळेल.
सरकारने या मसुद्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. इच्छुक नागरिक 13 जुलै 2026 पर्यंत आपली मते सरकारकडे पाठवू शकतात. नागरिकांच्या सूचनांनंतरच अंतिम निर्णय होईल.