Jagdish Patil
प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत OBC आरक्षण वाचलं पाहिजे, अशी मागणी केली.
मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटलं नाही. मात्र, त्यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार असं आंबेडकर म्हणाले. तसेच OBC आणि SC, ST साठीही त्यांनी विविध मागण्या केल्या.
SC, ST विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप डबल झाली पाहिजे.
ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा SC, ST ची स्कॉलरशिप लागू झाली पाहिजे.
गडबडीतमध्ये कास्ट फॉर्म इशू करण्यात आले आहेत ते रद्द करण्यात यावं.
जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच आहे.
आरक्षणात SC, ST आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे.
श्रीमंत मराठ्यांचे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत. तोपर्यंत तोडगा निघणार नाही, असंही आंबेडकर म्हणाले.
NEXT : कोण आहेत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती? ठाकरेंच्या भेटीनंतर वादाची ठिणगी...