Rajanand More
उत्तराखंड राज्यातील जोशीमठ येथील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती त्यांच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतात.
नुकतीच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची भेट घेतली. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ते गेले होते.
उध्दव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. त्याचे आम्हाला दु:ख आहे. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय ते दूर होणार नाही, असे विधान शंकराचार्यांनी केले होते.
अनंत अंबानी यांच्या विवाहात पंतप्रधान नरेंद्र मोदी शंकराचार्यांच्या पाया पडले होते. त्यावरही त्यांनी मोदी हे आपले दुश्मन नसल्याचे विधान केले होते.
शंकराचार्यांच्या विधानामुळे राजकारण तापलं आहे. ते धार्मिक कमी आणि राजकीय अधिक असल्याचे टीका काही नेत्यांनी केली आहे. तसेच त्यांना काँग्रेसचे समर्थक मानले जात आहे.
अविमुक्तेश्वरानंद यांचे गुरू जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे स्वातंत्र्यसैनिक होते. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांच्या निधनानंतर अविमुक्तेश्वरानंद नवे शंकराचार्य बनले.
उत्तर प्रदेशातील ब्राम्हणपूर गावात त्यांचा जन्म झाला. उमाशंकर उपाध्याय हे त्यांचे मूळ नाव आहे.
वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयातून शास्त्री आणि आचार्यचे शिक्षण घेतले. याच काळात 1994 मध्ये विद्यार्थी संघाची निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
15 एप्रिल 2003 मध्ये दंड संन्यासची दीक्षा घेतल्यानंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे नाव मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.