Amol Sutar
नरेंद्र मोदींनी 108 क्रमांकाचे महत्त्व आणि त्याचे पावित्र्य हा सखोल अभ्यासाचा विषय असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना फिट आणि तंदुरुस्त राहण्याचा आरोग्यमंत्र दिला.
शांती, प्रेम, आनंद, वेदना, नैराश्य, परमानंद म्हणतो, ते सर्व रासायनिक आणि न्यूरोलॉजिकल घटकांमुळे घडत असल्याचे सद्गुरु जगदीश वासुदेव यांनी सांगितले.
सतत व्यायाम आणि 7 तासांची पूर्ण झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यास मदत होते, अशी प्रतिक्रीया क्रिकेट खेळाडू हरमनप्रीत कौर यांनी दिली.
योगासने, कार्डिओ, स्ट्रेचिंग, वेट ट्रेनिंग करणे महत्त्वाचे आहे. रात्री किमान 7 - 8 तासांची झोप गरजेची असल्याचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी सांगितले.
फिल्मस्टार बघून बॉडी बनवू नये. आज पासून फिटर लाईफ जगा, फिल्टर लाईफ नाही, असा सल्ला अभिनेता अक्षय कुमार याने युवकांना दिला.
फिट इंडिया, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि पोषण यावर पंतप्रधान मोदींनी चर्चा केली.
आज शारीरिक आरोग्य आणि निरोगीपणाबद्दल चर्चा केली जाते, परंतु त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मानसिक आरोग्य असल्याचे मोदींना सांगितले.
मोदींनी श्रीरामाचे भजन सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले. श्रीराम भजन हॅशटॅगसह त्यांची निर्मिती शेअर करावी, असेही त्यांनी सांगितले.
NEXT Year Ender 2023: 'हे' राजकीय नेते २०२३ वर्षात राहिले चर्चेत