Pradeep Pendhare
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बजरंग दलातील वादात न्यायालयात पोहोचले आहे.
पंजाबमधील संगरून जिल्हा न्यायालयाने मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात वाॅरंट जारी केले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांना, स्वतःला 19 सप्टेंबरला न्यायालयात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.
2023 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या प्रचाराशी निगडीत हे प्रकरण आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान खर्गे यांनी बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी केली होती.
काँग्रेसची सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचा उल्लेखही त्यांनी केला होता. न्यायालयाने दिवाणी प्रकरणात पुढे फौजदारी खटला सुरू केला.
19 सप्टेंबरला मल्लिकार्जुन खर्गे न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहिले नाहीत, तर त्यांच्या विरोधात गैर-जामीनपात्र वॉरंट जारी होईल.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यामुळे संघटनेची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला.