Mamata Banerjee : आमदारही नसलेल्या ममता बॅनर्जींना मिळत राहणार 'या' सुविधा

Rajanand More

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. आता त्या आमदारही नाहीत. तरीही त्यांना कोणत्या सुविधा मिळणार हे जाणून घेऊयात.

mamata banerjee | Sarkarnama

राज्यांना अधिकार

भारतीय संविधानातील कलम 164(5) नुसार राज्यांना मंत्र्यांचे व आमदारांचे वेतन-भत्ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यानुसार ममतांना विविध सुविधा मिळत राहतील.

Mamata Banerjee

पेन्शन

ममतादीदींना माजी आमदार म्हणून पेन्शनचा अधिकार आहे. पश्चिम बंगालमध्ये माजी आमदारांना दरमहा किमान ३१ हजार रुपये पेन्शन. ५ वर्षांहून अधिक काळ आमदार असल्याने प्रत्येक अतिरिक्त वर्षाला २,५०० रुपये वाढीव रक्कम.

Mamata Banerjee | Sarkarnama

सुरक्षा कायम

माजी मुख्यमंत्र्‍यांसाठी दिली जाणारी सुरक्षाव्यवस्थाही ममता बॅनर्जी यांच्यासाठी कायम असेल. निवासस्थानाबाहेर तसेच प्रवासात त्यांना मोठा पोलीस बंदोबस्त आणि अंगरक्षक असतील.

Mamata Banerjee | Sarkarnama

सरकारी बंगला नाही

मुख्यमंत्री असतानाही ममता बॅनर्जी या सरकारी बंगल्यात राहिल्या नाहीत. कालीघाटमधील त्यांच्या खासगी घरातच राहतात. त्यामुळे आताही त्या सरकारी निवासस्थान स्वीकारणार नाहीत.

Mamata Banerjee | Sarkarnama

आरोग्य सुविधा

माजी आमदार म्हणून त्यांना मोफत किंवा सवलतीच्या वैद्यकीय सुविधा मिळत राहतील. पश्चिम बंगाल सरकारने याबाबतचे निकष निश्चित केले आहेत.

Mamata Banerjee | Sarkarnama

प्रवासात सवलत

ममतांना माजी मुख्यमंत्री म्हणून रेल्वे प्रवासादरम्यान काही सवलती मिळतील. तसेच त्यांना नियमानुसार प्रवास भत्तेही मिळत राहतील.

Mamata Banerjee | Sarkarnama

दिमतीला कर्मचारी

माजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामकाजासाठी मर्यादित सचिवालयीन कर्मचारी किंवा सहाय्यक दिले जातील.

Mamata Banerjee

NEXT : विद्यमान मुख्यमंत्र्यांचा सलग दोनदा पराभव अन् देशात इतिहास घडला...

येथे क्लिक करा.