Rajanand More
पश्चिम बंगालची नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली आहे. राज्यात भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली आहे.
पश्चिम बंगाल भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनीही या निवडणुकीत इतिहास घडविला आहे. देशात पहिल्यांदाच असे घडले आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी सलग दोन विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आहे. तेही वेगवेगळ्या मतदारसंघात.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू यांनी नंदीग्राम मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता.
सुवेंदू यांनी ममतादीदींचा २०२६ च्या विधानसभा निवडणुकीतही पराभव केला. यावेळीही त्या CM होत्या. मतदारसंघ होता भवानीपूर.
विद्यमान मुख्यमंत्र्यांचा सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव करणारे सुवेंदू अधिकारी आता बंगालचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.
सुवेंदू अधिकारी यांचे राजकारण प्रामुख्याने तृणमूल काँग्रेसमध्येच सुरू झाले. कधीकाळी ममता यांच्यानंतर पक्षात ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते.
सुवेंदू यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत २०२१ ची निवडणूक कमळ चिन्हावर लढविली होती. तेव्हापासून ते ममतांविरोधात अधिकच आक्रमक झाले होते.