वादग्रस्त आदेश मागे तरीही राजीनाम्याची मागणी : CJP चे नेक्स्ट टार्गेट असलेले मनन मिश्रा कोण?

Jagdish Patil

CJP

CJP संस्थापक अभिजीत दीपके आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

CJP Abhijeet Dipke | Sarkarnama

CJI सूर्यकांत

मिश्रा यांनी CJI सूर्यकांत यांचा विरोध करणाऱ्या 2026 बॅचच्या विद्यार्थ्यांना देशभरात वकिली करण्यासाठी नोंदणी न करण्याचा आदेश दिला होता.

Manan Mishra | Sarkarnama

राजीनामा

हा आदेश वादात सापडल्यानंतर तो मागे घेण्यात आला आहे. मात्र, यावरून CJP ने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Manan Mishra

मनन कुमार मिश्रा

मनन कुमार मिश्रा हे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील असून ते सध्या भाजपचे राज्यसभा खासदार आणि BCI चे अध्यक्ष आहेत.

Manan Mishra | Sarkarnama

शिक्षण

त्यांनी पटना विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतलंय, तर छपरातील राजेंद्र महाविद्यालयातून त्यांनी बीएससी ऑनर्स केलं आहे.

Manan Mishra

मालमत्ता

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोपालगंज दिवाणी न्यायालयात वकिली केली. त्यांच्याकडे सुमारे 14 कोटींहून अधिकची मालमत्ता आहे.

Manan Mishra | Sarkarnama

वकील

1982 मध्ये मिश्रा यांनी पटना उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम केलं.

Manan Mishra

अध्यक्ष

ते दीर्घकाळापासून BCI अध्यक्ष राहिले असून 2025 मध्ये सलग सातव्यांदा त्यांची निवड झाली.

Manan Mishra | Sarkarnama

राजकारण

2010 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बैकुंठपूर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Manan Mishra

राज्यसभा

2024 मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असून त्यांनी बिनविरोध विजय मिळवला.

Manan Mishra | Sarkarnama

NEXT : घरात कोट्यवधींचे घबाड सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा 'त्या' 3 आरोपांमुळे ठरले दोषी!

Justice Yashwant Varma Case
क्लिक करा