UIDAI चा मोठा खुलासा, 'या' कामांसाठी Valid नाही आधार कार्ड

Rashmi Mane

UIDAI चा मोठा खुलासा!

आधार आता जवळपास प्रत्येक शासकीय प्रक्रियेशी जोडला गेला आहे. पण तो सर्व गोष्टींसाठी वापरता येतो का? UIDAI ने यावर मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

Aadhar Card | Sarkarnama

काय आहे नवीन स्पष्टीकरण?

UIDAI ने स्पष्ट सांगितले आहे की आधार फक्त ओळखपत्र म्हणून वैध आहे, पण नागरिकत्व किंवा राहिवासी प्रमाणपत्र म्हणून नाही.

Aadhar Card | Sarkarnama

जन्मतारखेचा पुरावा

UIDAI नुसार, आधारवर नमूद असलेली जन्मतारीख केवळ माहिती आहे, ती कायदेशीर पुरावा नाही. म्हणून जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी इतर अधिकृत कागदपत्रांचा वापर करावा लागेल.

Aadhar Card | Sarkarnama

कुठे आवश्यक आहे आधार?

आजच्या काळात अनेक व्यवहारांमध्ये आधार अनिवार्य आहे

  • आयकर रिटर्न (ITR) दाखल करताना

  • PAN-आधार लिंक करताना

  • बँक खाते उघडताना

  • नवीन मोबाईल सिम घेताना

Aadhar Card | Sarkarnama

आर्थिक व्यवहारात आधारचे महत्त्व

म्युच्युअल फंड, KYC वेरिफिकेशन आणि इतर गुंतवणुकींसाठी आधार आवश्यक आहे.
सरकारी सबसिडी आणि कल्याणकारी योजनांमध्येही आधारशिवाय लाभ मिळत नाही.

Aadhar Card | Sarkarnama

सरकारी योजनांमध्ये आधारचा वापर

एलपीजी सबसिडी, कर्मचारी पेन्शन योजना (EPS), अटल पेन्शन योजना (APY),
शिष्यवृत्ती, श्रम कल्याण योजना, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर अनेक सेवांसाठी आधार ऑथेंटिकेशन आवश्यक आहे.

Aadhar Card

नागरिकांसाठी महत्त्वाचा संदेश

UIDAI ने स्पष्ट सांगितले आहे की, आधार तुमची ओळख सिद्ध करतो. पण नागरिकत्व किंवा जन्मतारीख नाही. म्हणून चुकीच्या अफवांपासून सावध राहा आणि योग्य माहितीचं प्रसारण करा.

Srkarnama

Next : बच्चू कडूंचा कोणत्या मागण्यांसाठी महाएल्गार? 

येथे क्लिक करा